नमस्कार स्वागत आहे तुमच The Secret Curry ब्लॉग मध्ये
पावसाळा आला की प्रत्येकाला छान कुरकुरीत खावसं वाटत, त्यामधे कांदा भजी म्हणजे सर्वानाच आवडतात म्हणुन पावसाळा विशेष कांदा भजीची रेसीपी शेअर करत आहे, तर ही कांदा भजी नक्की करून बघा
साहित्य
• २ उभे चिरलेले कांदे
• १/२ चमचा मीठ
• बेसन
• १/४ चमचा हळद
• १ चमचा लाल तिखट
• ओवा
• तळण्यासाठी तेल
कृती –
१. दोन मोठे कांदे उभे चिरून घ्यायचे
२. कांद्या मध्ये १/२ चमचा मीठ घालावे
३. मीठ कांद्याला छान लाऊन घ्यायचे यामुळे कांद्याला पाणी सुटेल
४.कांद्या मध्ये हळद, लाल तिखट, ओवा घालावा अणि सर्व एकत्र करून घ्यावे
५.कांद्या मध्ये मावेल तेवढे बेसन पीठ घालावे
६. गरज पडल्यास थोडासा पान्याचा शिपका मारावा
७. कढईत तेल गरम करायला ठेवावे, तेल गरम झाले की त्यामधे भजी सोडून घ्यावी
८. मध्यम गॅस वर भजी कुरकुरीत होई पर्यंत तळून घ्यावी
तयार आहेत कुरकुरीत कांदा भजी
संपुर्ण कृतीचा video :