मटकीची उसळ ही लोकप्रिय मराठी रेसिपी आहे. सकाळच्या नाश्त्याला, चपाती सोबत किंवा भेळ सोबत तुम्ही ही उसळ खाऊ शकता.
साहित्य
• मटकी (भिजवून, मोड आलेली) – १ कप
• कांदा (बारीक चिरलेला) – १
• टोमॅटो (बारीक चिरलेला) – १
• हिरवी मिरची (बारीक चिरलेली) – २-३
• लसूण – ५-६( ठेचलेला)
• हळद – १/४ चमचा
• लाल तिखट – १ चमचा
• गरम मसाला – १/४चमचा
• धने पूड – १ चमचा
• जिरे – १/२ चमचा
• मोहरी – १/२ चमचा
• मीठ – चवीनुसार
• तेल – २ चमचे
• कोथिंबीर (बारीक चिरलेली) – सजावटीसाठी
कृती :
१.एका कढईत तेल गरम करा आणि त्यात जिरे व मोहरी आणि कढीपत्ता घाला.
२.जिरे तडतडल्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या.
३.कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परता.
४.त्यात टोमॅटो, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि धनेपूड घालून मिक्स करा.
५.टोमॅटो मऊ झाल्यावर मटकी घालून चांगले मिसळा.
६.मीठ घालून चांगले मिसळा
७.थोडे पाणी घालून झाकण ठेवा आणि मटकी पूर्ण शिजेपर्यंत शिजवा.
८.कोथिंबीर घालून सजवा आणि गरमागरम मटकी उसळ पोळी किंवा भाकरी सोबत सर्व्ह करा.
संपूर्ण कृतीचा video