गणेशोत्सव आला की १० दिवसा मध्ये मोदकाचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात त्यामधे सर्वात सोपा अणि पटकन तयार होणारा प्रकार म्हणजे रसमलाई मोदक. रसमलाई मोदक पटकन तयार होतात, तोंडात टाकताच विरघळतील असे मऊ होतात आणि घाईच्या वेळी आपण पटकन बनवू शकतो.
साहित्य :
• पनीर – १कप
• मिल्क पावडर – १/२ कप
• पिठी साखर – ४चमचे
• काजु पावडर – २ चमचे
• तूप – २ चमचे
• गुलाबाच्या पाकळ्या (सजावटी साठी)
• पिस्ता (सजावटी साठी
कृती :
१. एक कप पनीर मिक्सर बारीक करून घ्यावे.
२. पॅन मध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचे
३. पॅन मध्ये बारीक केलेल पनीर, मिल्क पावडर, काजू पावडर, आणि पिठी साखर टाकुन घ्यावी
४. मंद आचेवर सर्व परतवून घ्यावे
५. मिनिट भरातच साखर विरघळायला लागेल
६. सुरुवातीला मिश्रण पातळ वाटेल पन हळू हळू ते घट्ट व्हायला लागेल म्हणुन ४-५ मिनिट मिश्रण परतत रहायचे
७. ४-५ मिनिट झाल्यावर गॅस बंद करून मिश्रण थंड करून घ्यायचे
८. सजावटी साठी त्या मध्ये गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्ता टाकून घ्यायचा
९. मोदकाच्या साच्यात मिश्रण भरून मोदक तयार करायचा
तयार आहे रस मलाई मोदक
संपूर्ण कृती चा video :